Sunday, 16 May 2021

मराठी गीत

# परस

तो : दाटतो आहे कोवळा अंधार
ती : किलकिले परसाचे सोवळे दार

ती : ध्यानी-मनी तुझाच विचार
तो : अन अंगात फुलला प्रीतिचा अंगार

तो : मन माझे ही सैरभैर
ती : वाट पाहते करुनी सोळा-शृंगार

तो : आतुरलेली तुझ्या घराकडली पाउलवाट
ती : आसुसलेल्या मनाने मीलनाचा घातला घाट

तो : हिरव्या बिछान्यावर गात्र अंथरावे
ती : गडद निळ्या आकाशाची चांदरात पांघरावी

तो : चंद्र हा पुनवेचा हळूच डोकवतो कसा
ती : नारळी-पोफळीलाच लागलाय जसा

ती : तुझ्या प्रेम सरीनी माझे सारे अंग भिजावे
तो : ओल्या केसांत तुझ्या हे मन वेडे व्हावे

तो : या प्रणयास पहा केळ ही कशी लवून बघते
ती : सोनचाफ्याचे झाड परी गालातच हसते

तो : डोळ्यात पहाता हरवूनी जावे
ती : तुझ्या मिठीत निर्धास्त निजावे

ती : उमलते अबोली अशी जणू नववधू लाजते
तो : रातराणीची जादू सा-या परसात संचारते

ती : तुझ्या स्पर्शाने गो-या गालांवर लाली चढे
तो : क्षण हा हवासा वाटुनही किती घेतेस आढे-वेढे

तो : तव मधुमिलनाचा पारिजातकांसही लोभ जडे
ती : अन पहाटे-पहाटे टपोर फुलांचा सडा पडे

©मनमित 2021

........

No comments:

Post a Comment