Thursday, 20 May 2021

मराठी गीत

# गंध तुझा...


गंध तुझा ताज्या फुलांपरी,

नेहमीच आठवण जागवितो उरी


गंध तुझा मधुर फळांसम,

आजही ओठांवर रेंगाळते तुझे गोड चुबंन


गंध तुझ्या नहालेल्या केसांतला रोजचाच परी,

जसा जागवती गंध मातीचा पहिल्या पावसाच्या सरी

*गंध... गंध... तुझा सुगंध, नेहमीच करतो मज बेधुंद


गंध तुझ्या नामात, गंध तुझ्या असण्यात

वाटते ओवाळूनी टाकावा जीव हा तुझ्याच दानात


गंध तुझ्या प्रेमाचा, लावतो जीवास आस,

अन् वेडावतो माझ्या अंग-प्रत्यंगास


तव गंध कोवळ्या उन्हाचा गारठलेल्या सकाळी,

जशी पहाट धुक्याच्या गंधाची सोवळ्यातील नव्हाळी

(Repeat*)


गंध तू उतरवलेल्या वस्त्रांचा,

जाणवून देतो बोथटपणा साऱ्यां अस्त्रांचा


गंध तुझा मृग कस्तुरी सारखा,

आठवणीच्या कुपीतील अत्तरास सदा राही पारखा


गंध परत परत उठणाऱ्यां सागर लाटांचा,
जसा गंध प्रणयात उचंबळणाऱ्यां क्षणांचा

(Repeat*)


गंध कोऱ्यां पुस्तकाच्या पानांत जपलेल्या स्मृतींचा,

जसा गंध हलकेच झालेल्या तुझ्या स्पर्शाचा


गंध तुझा नुकत्याच उगाळलेल्या चंदनाचा,

अन् गळ्यात गळा घालून अनुभवलेल्या स्पंदनांचा


गंध तुझ्या येण्याची चाहूल देती,

जणू दूरवर धूप-बत्ती दरवळती

(Repeat*)


जीव गुंतला तुझ्यात असा हे स्वप्न-सुंदरी,

गंध तुझ्या श्वासांचा जागवी गोड शिरशिरी


गंध असा उल्हसित करी जणू मी पाखरू जाहलो,

आज सारी तृष्णा शमली अन मी तव गंधात नाहलो


गंध तव नजरेच्या मदन बाणांचा जे लागले जिव्हारी,

आठवून देती आपुली असहाय्य वचने सारी

(Repeat* twice to fade)

........

©मनमित 2021

No comments:

Post a Comment