# पिरेम
इच्या गावात,
अस कुठवर चालायचं
भीगि-भीगि जायाचं,
कचकन, ब्रेक लाऊन थांबायचं
वळणावर, वळून पहायचं,
मगावरच, पाव्हन हेरायचं
नाक मुरडत, खट्याळ हसायचं
अन पुढच्या, वळणावर गुल व्हायचं
*रंभा, मेनका की अप्सरा
तुला आम्ही काय समजायचं
किती वाट पहायला लावायचं
किती या दिलानी तरसायचं
आपल्याच माणसाशी का म्हणून अस वागायचं
जसं मांजरानं उंदराला खेळवायचं
येवढ्याश्या जिवाला किती घोर लावायचं
आम्ही तुझच सपान बघायचं
अन तू अंमळ दूरच रहायचं
(Repeat *)
गुलू-गुलू बोलायचं,
जोडीनं खायाचं-पियाचं
कशापायी येव्हढ रुसायचं
गुरं-ढोरं बी करत्यात की पिरेम
मग आपण कशापायी लाजायचं
दिवसभर हिंडायच-फिरायचं
ऐ-या-गै-यांचं कशाला ऐकायचं
(Repeat *)
जीव वर-खाली होइल तेवढं सांभाळायचं
संगतीनं चालाया असं नाही थकायचं
साडी, चोळी अन हिरवा चुडा
ठरलय नव्हं या बारी लगीन करायचं
मंग अस न्हाई डोळ्यात पाणी आणायचं
हातात घेतलाय हात आता नाही भियाचं
तुझ्या बिगर जगनं आता मला नाही जमायचं
©मनमित 2021
........
No comments:
Post a Comment