Friday, 21 May 2021

मराठी गीत

# षोडश प्रेम

मागे-मागे जावं, छानसं हसावं
डोळयांत पहावं, स्वतःलाच हरवून बसावं
*एकदा तरी षोडश प्रेम अनुभवावं
आणि जीवन चिर-तरूण करावं

रोज-रोज संध्याकाळी चोरुन भेटावं
खेटून बसावं, गुलुगुलु बोलावं
जास्तच का होईना एकमेकांच कौतुक करावं
इशारों-इशारों में प्रेम व्हावं
(Repeat *)

हॉटेलात जावं, एकाच प्लेट मधे खावं
मस्ती करावी, थोडं चावट पण व्हावं
मग तिनं लाटक्या रागानं बघावं
अन् तिच्या नकळत गुलाबी ओठांना चुंबावं
(Repeat *)

तासन्-तास तिच्याकडे पहात रहावं
हसावं-रडावं, एकमेकांच्या मिठीत झोपावं
अन् रात्रभर एकमेकांच्या स्वप्नात रमावं
हाती घेऊन हात तिचा मग प्रेमगीत गावं
(Repeat *)

भांडावं-ओरडावं, क्षणात सारं विसरावं
कधी धरावा अबोला, कधी छान-छान बोलावं
थोडं घ्यावं, भर-भरुन द्यावं
कडू-गोड सारं चाखावं, कधी मनातही डोकवावं
(Repeat *)

रुसावं, फुगावं, एकमेकां मनवावं
तिच्यासाठी जगावं, तिच्याचसाठी मरावं
मीलना बरोबर विरहाचं दुखः पण अनुभवावं
अन् तिच्या साठी स्वतःला झोकून द्यावं
(Repeat * twice to fade)

©मनमित 2021
........

No comments:

Post a Comment