# काळरात्र
उजेडाशी नातं तोडूनी,
काळोखाच्या सोबत गेली
बघता बघता त्यास गिळूनी,
सावली मोठी जाहली
काळरात्र झाली, कशी काळरात्र झाली...
तेजाचं ते धुड बाळगुनी पोटी,
ती भीषण तांडव करु लागली
काळ्या भिन्न आंधाराला लाजवुनी,
सावली अधिक गर्द जाहली
काळरात्र झाली, कशी काळरात्र झाली...
ज्या प्रकाशानं जन्मा घातली,
परतफेड त्याची अशी ही केली
हरेक दिव्या मागे राहुनी,
सावली पाठी वार करत राहिली
काळरात्र झाली, कशी काळरात्र झाली...
धगधगत्या ज्वाळांत स्वतःला झोकुनी,
सावली धुराची पसरवे काजळी
आसमंतात झेपावली धरती पुर्ण व्यापुनी,
तळपत्या सुर्याची प्रतिभाच जणू झाकोळली
काळरात्र झाली, कशी काळरात्र झाली...
जीवनाला ऊब देणारी ज्योत,
विषारी फुंकर घालून विझवली
थकून झोपलेल्या जगाला,
मृत्यूच्या थंडगार छायेत ढकलून गेली
काळरात्र झाली, कशी काळरात्र झाली...
©मनमित 2021
........
तळपत्या सुर्याची प्रतिभाच जणू झाकोळली
काळरात्र झाली, कशी काळरात्र झाली...
जीवनाला ऊब देणारी ज्योत,
विषारी फुंकर घालून विझवली
थकून झोपलेल्या जगाला,
मृत्यूच्या थंडगार छायेत ढकलून गेली
काळरात्र झाली, कशी काळरात्र झाली...
©मनमित 2021
........
No comments:
Post a Comment