# माझ्या मना
तू असा हळवा, थोडासा वेंधळा
साधा सरळ तू, जसा सांब भोळा
तुला कसे समजावू, या जीवाच्या नाना कळा
सांग ना, असा कसा रे तू माझ्या मना
सा-यांनाच कसा लागतो तुझा लळा...
*साऱ्यांना कळले तरी तुलाच का कळेना
सारे कळले मलाही परी हेच का कळेना
जगावे कसे मी तुझ्याविना
का जगावे मी तुझ्याविना
सांग ना, असा कसा रे तू माझ्या मना...
**तूच शिकवली जगण्याची रीत
तूच जागवली हृदयात प्रीत
तुजविन लागे जग सुने-सुने,
तुजविन आता मला करमेना
सांग ना, असा कसा रे तू माझ्या मना...
काय करावे, कसे करावे काही सुचेना...
मज वाटे प्रेम, जीवनाचा सोहळा
यौवनात येता वयाच्या लागल्या झळा
तू मात्र राहिलास कसा कोवळा
सांग ना, असा कसा रे तू माझ्या मना
सा-यांनाच कसा लागतो तुझा लळा...
(Repeat* n **)
तुझ्या सम तूच, तू लाखात विरळा
तरसते रुक्माई तुझी, तू माझा विठू सावळा
अजूनही तू असा दूर का लडिवाळा
सांग ना, असा कसा रे तू माझ्या मना
सा-यांनाच कसा लागतो तुझा लळा...
(Repeat* n **)
तुच जाणतो कसे फुलवावे मजसम कातळा
मधूमिलनात सखया तन झाले चोळामोळा
मी झाले मलिन, मग तू राहीलास कसा सोवळा
सांग ना, असा कसा रे तू माझ्या मना
सा-यांनाच कसा लागतो तुझा लळा...
(Repeat* n **)
........
No comments:
Post a Comment