काळजास हूर-हूर लागून आहे
हृदयात धग अजूनही आहे
हल्किशी एक फुंकर दे
मनातल्या ठिणग्यानां हवा दे
पेटतील धगधगते निखारे
भडकेल वणवा, होईल खाक जळुनि सारे
राखेतून परत जन्म घेईल मी
फिनिक्स पक्षापरी गगन भरारी घेईन मी
डोक्यात विचारांच काहूर आहे
ऊरात एक वादळ निजुन आहे
बस तू एक नजर दे
डोळ्यांतल्या आसवांना वाट दे
उठतील आक्रंदुन सारे इशारे
येईल तुफान, वाहतील सोसाट्याचे वारें
चिरनिद्रेतून जागेल मी
धरती फाडून परत उमलेन मी
स्मरणात सुन-सुन जग आहे
श्वासांत रण-रणतं ऊन आहे
भावनांना तू पंख दे
रणधुमाळीला नवा शंख दे
संघर्षाचे झडतील ढोल नगारे
अहंकाराची होइल होळी, नष्ट होतील चराचरे
अमूर्तास मूर्त स्वरुप देईल मी
आठवणीतून परत उजळेल मी
........
No comments:
Post a Comment