Wednesday, 30 June 2021

मराठी गीत

# समुद्र मंथन

मी सहज बोललो करावे सर्वांनी एकदा चिंतन,
पुन्हा हाती घ्यावे कराया समुद्र मंथन

देव-दानवां बोलवावे फिरुनी या भूतलावर,
परी संशय दाटतो मनी, घेईल का कुणी मनावर

आणि जमलेच सारे एक होऊन,
तर निघेल का अमृत समुद्र मंथनातुन

मागल्या वेळी देवांचा देव महादेव,
होता पचवायास हलाहल

यावेळी कोण होइल नीलकन्ठ,
कोण येईल पुढे चल-अचल

भगवान विष्णूनीं होउन कुर्म अवतार,
मंथनास अंगावर घेऊन केले होते स्वप्न साकार

मेरू पर्वतास मन्थनी आणि
वासुकीला बनवले होते नेती

आता मनुष्य पण राहणार नाही मागे,
तिन-तिगडा, काम बिगडा अशी होइल का स्थिती

अन झालेच मंथन तर निघतील का हो चौदा रत्न
आणि निघालीच तर ती मिळवाया कोण करील किती यत्न

कोण घेईल विष अन कोणास मिळेल अमृत,
कुणा-कुणाचे शिर उडेल अन कोण राहिल शाबूत

प्रश्नच प्रश्न आहेत उत्तर मात्र नाही,
कदाचीत आधी करावे लागेल विचार मंथन
मगच नीट होइल समुद्र मंथन!

©मनमित 2021
........

No comments:

Post a Comment