मनमित
वाईट-साईट, काळे-बेरे कसले कसले मनाचे खेळ
आपलेच दात अन आपलेच ओठ, शत्रूच बरा म्हणावा अशी विचारांची भेळ
कसलंच भान नाही, कशात जान नाही,
विचार आगळे, आचार वेगळे
आतचा अन बाहेरचा, कसचाच लागत नाहीय मेळ
काळ आला होता फक्त घटिका भरली नव्हती,
अशीच म्हणायची आलीय वेळ
मन आचल, मन चपळ
आता भुईवर तर
क्षणात करी सूर्य जवळ
मन दुबळे, मन प्रबळ
येता मनी खुडून आणिल तारे अंमळ
माझीया मनास एक मित असावा ऐसा, शब्दाविन घ्यावा मनीचा ठाव
अन डोळ्यात वाचावे सारे भाव
मन शून्य, मन अनंत
कधी मोह संसाराचा,
कधी फकीर, कधी होते साधुसंत
मन सत्य, मन शिव
मन सुंदर, आतर्क्य जीव-निर्जीव
माझीया मनास एक मित असावा ऐसा, कधी साथ शशी-किरणांची,
कधी हाती हात दिनकराचा
मन शाप, मन वरदान
पाप-पुण्याचे संचित,
मानावे तर समाधान
मन प्रारब्ध, मन कर्म
फळ भोगावे हेची सांगतो धर्म
माझीया मनास एक मित असावा ऐसा,
मोक्षातही अंतरंगीचा साक्षीदार जैसा
मन शत्रू वृत्ती रावणाचे नाम
मन सुदामा मित्र घनश्याम
कधी शांत,
कधी न मिटणारी भ्रांत
नाही ओलांडणार उंबरा घराचा, कधी वेध सार्या नभाचा
माझीया मनास एक मित असावा ऐसा सोबतीला,
साद येता अंतरीची हजर व्हावा दिमतीला
No comments:
Post a Comment