# तू आणि मी
*मी आणि तू, तू आणि मी
आपुल्या परी सुखी नसेल कोणी
डोळ्यात घालुनी डोळे, श्वासांत श्वास मिसळू दे
प्रीत आपुली आज, चराचरास कळू दे
सागर मी आणि किनारा तू
कातळ होऊन लाट माझी परत दे
तुझ्या असण्यात अस्तित्व माझे
हाती घेउनी हात तू, आज माझ्या सवेत ये
(Repeat *)
वृक्ष तू आणि वेल मी
तुला बिलगून उंच-उंच वाढू दे
तुझ्याविन कशी जगू मी
हरिणी च्या पाडसापरी, आज मजला कवेत घे
(Repeat *)
पाखरु मी आणि आभाळ तू
तुझ्या निळाईत हरवू दे
पंखास माझ्या बळ देऊनी
मज हवेशी आज, स्पर्धा करु दे
(Repeat * to fade)
©मनमित 2021
........
No comments:
Post a Comment