Tuesday, 23 March 2021

मराठी गीत


# घरटे

कौतुकानं साथ देणारं कोणी असेल,
तर मेहनतीने घरटे बांधण्यात अर्थ आहे

स्वप्नातला जोडीदारच खरा होणार नसेल,
तर घरट्याचं स्वप्न पहाणं मात्र व्यर्थ आहे

वादळात घरटे बांधते आहेस चिमणे,
बांध पण जरा जपून

पावसाची संततधार अन विजांचा कडकडाट,
कुठे चुकलीस, धडपडलीस तर सावरायला कोणी नाही

तेंव्हा माझे येव्हढेच सांगणे,
मदतीला आहे का चिमणा आधी बघ हाक देऊन

तू प्रेम केलयस, संसार थाटलायस,
पण त्याचा काय नेम सांगावा, गेला असेल भुर्र उडून


सोबत येणारं कोणी अपलं असेल,
तर त्याची वाट पाहणं सार्थ आहे

काडीला काडी अन धाग्याला धागा जुळेल,
पण मनं जुळली नाही तर मेहनतीत फक्त परमार्थ आहे

वादळात घरटे बांधते आहेस चिमणे,
बांध पण पक्का विचार करुन

गाव नवं, झाड नवं,
आपलं म्हणावं अस दूर-दूर कोणी नाही

शिका-याने लावले असेल जाळे, एकदा बघून घेणे
नंतर काहीच फायदा नाही पश्चाताप करुन

कावळ्यावर पण विश्वास न ठेवणे,
चिऊताई म्हणून येईल, अन सगळच जाईल विस्कटून


सोबत रहाणारं कोणी अपलं नसेल,
तर स्वतः पुरत पहाण्यात कुठे स्वार्थ आहे

धर्म युद्धात सारथी बनलेला जरी परमात्मा असेल,
तरी प्रत्यक्षात आप्तांशी लढलेला पार्थ आहे

तेंव्हा माझे येव्हढेच म्हणणे,
काय झाल कोणी मदतीला आले नाही म्हणून

षड्रिपू सारख्या भावनां पुढे,
तुमच्यात अणि परमात्म्यात इतर कोणीही नाही

आपल्या हाती आसते फक्त कर्तव्य निभावणे,
बाकी फळाची चिंता त्याच्या वर द्यायची सोडून

एकटीच्या जिवावर घरटे बांधत आहेस चिमणे,
कधी-कधी प्रत्येकाने बघाव अस स्वतःवरच प्रेम करुन

©मनमित 2021
........

No comments:

Post a Comment