Monday, 17 January 2022

मराठी गाणे

# तुझं-माझं

प्रीत मनी जागवूनी हसती,
नयन तूझे अबोल भोळे
तुझविन ह्रिदयी काळोख दाटे,
अन श्रावण झरती माझे डोळे
श्रावण झरती माझे डोळे, माझे डोळे...

तुला कशाचे न सोयर-सुतक,
मन अजूनही तुझे सोवळे
पण माझ्या नशिबी दाह ग्रीष्मातला,
असुनही शिशिरातले ऊन पिवळे
असुनही शिशिरातले ऊन पिवळे, ऊन पिवळे...

तुझ्या संसारी सौख्य नांदते,
गळ्यात गुंफले कुणी मणी काळे
ओसाड वाटेवरी घर माझे,
अन दारी शोभती का जळमट-जाळे
दारी शोभती का जळमट-जाळे, जळमट-जाळे...

©मनमित 2022
........

No comments:

Post a Comment