Sunday, 1 August 2021

मराठी गीत

# शिवा-संभा

*मनात शिवा, ह्रदयात संभा
असतील खरेच देवस्थानी,
तर क्षणभर जरा थांबा
मराठी असल्याचं ठेवा भान
या मातीत घेतलाय जन्म,
असू दे या रक्ताचा अभिमान

भाळी मिरवी चतुर्थीचा चंद्र
उगवत्या सुर्यासम तेज झळाळते,
अन सळसळते चैतन्य रंध्र-रंध्र
पहाताच भावते तीक्ष्ण नजर
लोभस चेहऱ्यावर स्मित शोभते,
परी बोल कायम जबाबी हजर
(Repeat *)

दुश्मनाच्या तोंडी जया साठी सदा असे वाहवा
व्याघ्रास पाणी पाजते तलवार जयाची,
धर्म वाचविण्या जिवदान करतो हा सिंहाचा छावा
जसे नाते अद्वैताचे सदैव तसे हे पिता-पुत्र
असण्यानेच जयाच्या अस्तास जाते सारे अमंगल,
दैवता परी निरंतर भरुन रहातील शिवा-संभा सर्वत्र
(Repeat * to fade)

©मनमित 2021
........

No comments:

Post a Comment