Tuesday, 22 August 2023

मराठी गीत

# शापित रानवेल आणि श्वापद

उघड्या बोडक्या माळरानावर

आड वाटेच्या आढयावर

दगड-धोंड्यात उगवलेली

काट्यां-कुट्यात वाढलेली

एक रानवेल

आणि रानटी श्वापदाची वखवखणारी ती विखारी नजर


मुकाट काटेरी कुंपणावर चढलेली

भर यौवनात मलुल पडलेली

धुळीने माखलेली

कुस्करून फाटलेली

ती रानवेल

तिला पहाता झिंगलेली, वासनेत बरबटलेली

विषयासक्त पोटाखालची ती खळगी मुजोर 


तिन्ही सांजेला मिटुन घेतल्या पाकळ्या जरी

ओरबाडून रक्ताळलेली

मुक्तपणे वाटला सुगंध तरी

आपल्या चुरगळलेल्या फुलांना पारखी झालेली

सुकलेली शापित रानवेल

अन् उपभोगूनही सदा उपाशी असल्यागत तो

फाटल्या लक्तरांना झोंबणारा हिंस्रपणाचा कहर

©मनमित 2023
........

No comments:

Post a Comment